मानसिक आरोग्य आणि मोटिवेशन
उठा ! जागे व्हा ! आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला संदेश देणारे स्वामी विवेकानंद आणि एक उडाली ठिणगी लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या निर्मितीची नवी पहाट ही झाली अशी वाक्य कानावरती पडली की आपसूकच मनाला एक उभारी मिळते खचलेले मन पुन्हा त्याच जोमाने उठून कामाला लागते मनातील मरगळलेला आशावाद पुन्हा जिवंत होतो आणि आयुष्याला सामोरे जाण्याची एक नवी दिशा प्राप्त होते. अशाच थोर पराक्रमी विचारवंत व्यक्तींच्या सहवासात आपल्याला राहता आले नाही तरी देखील त्यांचे विचार मात्र आपण आपल्या आयुष्यात उतरवून आपण जीवनाला एक नवी दिशा एक नवा आयाम देऊ शकतो. ऊर्जेचा सिद्धांत आम्हाला असे सांगतो की ऊर्जा ही नष्टही करता येत नाही आणि ती पुन्हा निर्माण ही करता येत नाही ही फक्त एका घटकांकडून दुसऱ्या घटकाकडे हस्तांतरित करता येते थोर पुरुष देखील ऊर्जेसारखेच असतात ते पुन्हा निर्माण ही करता येत नाहीत आणि त्यांना नष्टही करता येत नाही परंतु त्यांचे विचार मात्र एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे हस्तांतरित करता येतात.
आपले मानसिक आरोग्य आणि मोटिवेशन यांचा खूप जवळचा संबंध असतो ज्यावेळी आपण कोणत्याही एका कारणांमुळे निराश होतो दुखी होतो अशावेळी आपल्या मनाला उभार देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे थोर विचारवंत पराक्रमी व्यक्ती आणि त्यांचे विचार आणि अशा व्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून वाचायला मिळतात त्यांच्या विचारानेच आपल्या मनाचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकतो.
मनामध्ये आलेला कोणताही नकारात्मक विचार जर आपल्याला मनातून काढून टाकायचा असेल तर त्या जागी सकारात्मक विचारांची जडणघडण करावी लागते यासाठी आपण वेगवेगळ्या पराक्रमी, विचारवंत लोकांचे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणून नकारात्मक विचार बाहेर घालवू शकतो आणि आपल्या मनातील आत्मविश्वास पुन्हा नव्याने निर्माण करून समोर असलेल्या नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक परिस्थितीमध्ये बदलू शकतो.
या ठिकाणी आपण नेपोलियन बोनापार्ट ची एक गोष्ट पाहूयात नेपोलियन एकदा युद्धाला जात असतात जाताना सोबत काही सैनिक घेऊन पुढे जातात पुढे गेल्यानंतर एक नदी आडवी लागते पलीकडे जाण्यासाठी ते एका नावेमध्ये बसतात आणि नदीच्या पलीकडे जातात पलीकडे समोरील मैदानावर दहा हजार सैनिक त्यांचे वाट पाहत उभे राहिलेले असतात. नावेतून खाली उतरून चिखलातून थोडे पुढे चालत जात असताना त्यांचा पाय निसटतो आणि ते तोंडावरती खाली पडतात खाली पडल्यानंतर समोरील दहाहजार सैनिकांमध्ये अपशकुन निर्माण होतो आणि सगळे सैनिक म्हणतात आपला राजा पडला आजचे युद्ध आपण हरणार तीच गोष्ट राजा हेरतो आणि ताडकन उठून उभे राहतो आणि समोरील दहा हजार सैनिकांना उद्देशून म्हणतो की आजचे युद्ध आपणच जिंकणार कारण या धरणी मातेने मला आलिंगन दिलेला आहे आणि धरणी माता मला म्हणते अरे उठ तुला आजचे हे युद्ध जिंकायचे आहे असे म्हटल्यानंतर समोरील सर्व सैनिकांमध्ये रक्त सळसळु लागतं आणि पुढे जाऊन अटॅक करतात आणि ते युद्ध जिंकले जाते.
तात्पर्य - नकारात्मक प्रसंग जरी निर्माण झाला तरी त्यातून सकारात्मक विचार मनामध्ये आणून आपण नकारात्मकतेवर मात करू शकतो.
Very essential for everyone
ReplyDelete