समुपदेशनाचे महत्व
आमच्या महाविद्यालयात समुपदेशनासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा अनुभव.
एक विद्यार्थी जीवन पाटील सर नावाने हाक मारत डिपार्टमेंट मध्ये आला त्याचवेळी मी T.Y च्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल संदर्भात माहिती देत होतो. आलेला विद्यार्थी मला वाटले ऍडमिशन साठी आला असेल पण नंतर तो थोडा घाबरलेला दिसला तसेच मी त्याला विचारले काय झाले तर तो म्हणाला सर मला तुमच्याशी बोलायचं आहे मी म्हटले एक पाच मिनिटे बसा मी तुमच्याशी बोलतो त्यानंतर TY चा विद्यार्थी निघून गेल्यानंतर मी त्या विद्यार्थ्यांशी बोलायला चालू केले.
तो विद्यार्थी बोलू लागला, सर मला थोडीशी भीती वाटते, मला तुमची मदत हवी आहे, मी म्हटले कशाची भीती वाटते.
तो म्हणाला, सर मी एका शहरातील कॉलेजमध्ये ऍडमिशन ला गेलो होतो तिथे गेल्यानंतर आसपासचे प्राध्यापक माझ्याकडे बघून आपापसात चर्चा करू लागले की हा इतका मोठा व्यक्ती, मोठी दाढी, आणि हा इथे आपल्याकडे ऍडमिशन ला आला आहे? हे मी ऐकल्यावर मला खूपच वाईट वाटले मी मनातून एकदम खचून गेलो माझ्या मनावर त्याचा खूपच परिणाम झाला कारण माझी आई काही वर्षांपूर्वी देवा घरी गेली आणि वडील देखील नुकतेच देवाघरी गेले. मला आपले आता कोणीच नाही अशा विचारात असतानाच मला कॉलेजमध्ये आलेला अनुभव माझ्या मनावरती गंभीर परिणाम करून गेला. मला खूप वाईट वाटले आणि मी त्या कॉलेजमध्ये पुन्हा प्रवेश घेतलाच नाही.
तसे बघायला गेले तर त्याचे वय 25 ते 30 यादरम्यान होते. पण अंगाने धीपाड आणि उंच होता.
पण त्याला कुठून तरी नाईट कॉलेज बद्दल माहिती मिळाली आणि त्याने नाईट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला परंतु आधीच्या कॉलेजमध्ये आलेला अनुभव त्याच्या मनावरती अजूनही तसाच रेंगाळत होता, पुढे प्रवेश घेऊ की नको पुढील शिक्षण घेऊ की नको असा सतत नकारात्मक विचार मनात येत होता परंतु तशाही परिस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला आणि योगायोगाने तो प्रथम वर्षाच्या स्वागत समारंभासाठी हजर होता, आणि या समारंभामध्ये सर्व शिक्षकांनी जी आपली ओळख करून दिली त्यामधून त्याला प्रेरणा मिळाली, एक आशावाद त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्याला त्या दिवशी खूपच छान वाटले, त्यानंतर त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि तो न डगमगता, न घाबरता धाडसाने कसेबसे का असेना समुपदेशन घेण्यासाठी महाविद्यालया मध्ये आला.
मी त्याला माझ्या परीने समुपदेशन केले आणि जो विद्यार्थी आत येताना घाबरत आला होता तो जाताना चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेऊन बाहेर गेला. मला ही खूप समाधान वाटले.
चांगल्या कामाची पोचपावती एका अनुभवातून पाहायला मिळाली.
तात्पर्य - एखादी छोटीशी ओळख देखील एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते.
डॉ. जीवन पाटील, समुपदेशक.
अतिशय महत्त्वपूर्ण कार्य ! 💐💐💐
ReplyDelete