Posts

Showing posts from November, 2025

मानसिक आरोग्य आणि मोटिवेशन

उठा ! जागे व्हा ! आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला संदेश देणारे स्वामी विवेकानंद आणि एक उडाली ठिणगी लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या निर्मितीची नवी पहाट ही झाली अशी वाक्य कानावरती पडली की आपसूकच मनाला एक उभारी मिळते खचलेले मन पुन्हा त्याच जोमाने उठून कामाला लागते मनातील मरगळलेला आशावाद पुन्हा जिवंत होतो आणि आयुष्याला सामोरे जाण्याची एक नवी दिशा प्राप्त होते. अशाच थोर पराक्रमी विचारवंत व्यक्तींच्या सहवासात आपल्याला राहता आले नाही तरी देखील त्यांचे विचार मात्र आपण आपल्या आयुष्यात उतरवून आपण जीवनाला एक नवी दिशा एक नवा आयाम देऊ शकतो. ऊर्जेचा सिद्धांत आम्हाला असे सांगतो की ऊर्जा ही नष्टही करता येत नाही आणि ती पुन्हा निर्माण ही करता येत नाही ही फक्त एका घटकांकडून दुसऱ्या घटकाकडे हस्तांतरित करता येते थोर पुरुष देखील ऊर्जेसारखेच असतात ते पुन्हा निर्माण ही करता येत नाहीत आणि त्यांना नष्टही करता येत नाही परंतु त्यांचे विचार मात्र एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे हस्तांतरित करता येतात.        आपले मानसिक आरोग्य आणि मोटिवेशन यांचा खूप जवळचा संबंध असतो ...